शिक्षणातील विविधता: नवसहस्त्रकासाठी नवी दृष्टी

सीमोर पॅपर्ट

भाषांतर : प्रो. जीतेंद्र शाह
श्री. प्रदीप देशपांडे

या समस्येकडे मी काहीसा उग्रपणे पहातच माझी भूमिका मांडणार आहे. कारण सत्ताधारी तसेच प्रशासनातील लोकांनी शिक्षणाविषयी जी दिशा पत्करली आहे, त्यातील मुलभूत असे अंतर्विरोध आणि विडंबने ठळकपणे जाणवतात.

आम्ही आज येथे विविधतेविषयी बोलणार आहोत. आमचे उपाध्यक्ष मि. अल गोर, ज्यांच्याविषयी आम्हाला अपार आदर आहे त्यांच्या नेत्रृत्वाखाली बोलणार आहोत. आपल्यासमोर एक प्रचंड विडंबना आहे ज्यावर सहसा कोणीही विश्वास ठेवणार नाही. मला विचित्र वाटते ते असे की जे प्रशासन आम्हाला शिक्षणातील विविधतेबाबत बोलण्याची आणि संगणकाद्वारे शिक्षण पद्धतीतील नव्या दिशेचा अवलंब करण्याची प्रेरणा देत आहे तेच दुसरीकडे आम्हाला पारंपारीक शिक्षणपद्धतीचा अवलंब करावयास भाग पाडत आहे. प्रषासनाचा जोर हा प्रमाणांवर(standards) व प्रमाण परिक्षांवर(standardized tests) प्रचंड वाढतोय. हे प्रमाण आणि ह्या परिक्षा ह्या मुळातच विविधतेच्या बरोबर विपरित आहेत एवढच नव्हे तर त्या आपल्याला एका चुकीच्या संकल्पनेत ढकलतात. मुळात आजच्या तरुणांसाठी कुठले ज्ञान योग्य आहे ह्याच्याच मुळात ते आघात करतात व १९ व्या शतकातील संकल्पनांना आपल्यावर लादतात. यात एक अत्यंत विक्षिप्त आणि खुळी बाब म्हणजे प्रमाण परिक्षांचे स्तोम. ह्यांत परिक्षांमध्ये काय विचारले जाते एवढच नव्हे तर या चाचण्या घेणं ही कल्पनाच ही एकोणिसाव्या शतकातील बुरसटलेली परंपरा आहे. ह्याचा परीणाम असा होणार आहे की आपण १९ व्या शतकात लोटले जात आहोत. विशेषत: जेव्हा आपण २१ व्या शतकात पाऊल टाकत आहोत अशा क्षणी १९ व्या शतकातील शिक्षण पद्धती अनुसरतो ही विडंबना नव्हे काय?

अर्थात मी सरसकट प्रमाणांच्या विरोधात नाही. जर प्रमाण म्हणजे असे असेल की ज्या अन्वये उच्च प्रमाण निर्धारीत करुन तरुणांना धाडशी, साहसी आणि बौध्दिक आव्हाने पेलण्यास प्रवृत्त करणे असेल तर त्यास आमचा मुळीच विरोध नाही. संगणकीय शिक्षण पद्धतीमुळे हे शक्य होऊ शकेल. परंतू हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एका रुढ विचारांपासून फारकत घेऊ. ही रुढ कल्पना म्हणजे संगणक हे प्रस्थापीत व जुनाट अभ्यासक्रम राबविण्याचं मात्र एक साधन आहे. संगणकीय पद्धती आणि प्रस्थापित पद्धतीत तेच तेच शिकता येते व त्यात काही फरक नाही असे नाही.
आम्ही हे सर्व कशासाठी करीत आहोत? कारण असं की शिक्षणाविषयी समाजात व्यापक गैरसमज असून ते दूर करावेत म्हणून आम्ही नवा कार्यक्रम तयार करून घेत आहोत. आपल्या देशातील सर्व शाळा वर्ग आम्ही इंटरनेटने जोडणार आहोत त्यासाठी प्रस्थापित पद्धती द्वारे प्रत्येक वर्गात एक किंवा चार संगणक ठेवणार आहोत.

हा कार्यक्रम एका कल्पनेचा उपयोग करतो. कल्पना अशी करायची की असा एक समाज होता की, त्यावेळी शाळा वर्ग असतील पण लिहीण्याचा किंवा लेखन कलेचा जन्म झालेला नसावा म्हणजे पुस्तकेही नसावीत आणि पेन्सिल नसावी. लोक तोंडाने शिकवित (मौलिक) आणि मनापासून ऐकणारे बोलणे ऐकूनच शिकत. ह्या यंत्रणे द्वारा हे शक्य आहे.

कोणीतरी लेखन लिपीचा शोध लावला. मग कोणीतरी पेन्सिल शोधून काढली. अशावेळी कोणी सहजपणे म्हणेल "व्वा. अशा शोधामुळे आपली शिक्षण व्यवस्था समृध्द होईल. शिक्षण क्षेत्रात क्रांती होईल." आम्हीपण तेच म्हणतो. पेन्सिलीऐवजी संगणक ठेवा प्रत्येक वर्गात आणि पहा हा काय करतो ते. तर हा कार्यक्रम तेच साधणार नाही का? कारण ही पेन्सिल नेहमीच केवळ काही तास, आठवडाभर, का दिवसभर तुमच्यासंगे असणारी वस्तु आहे. मी ती क्षणात खिशातून काढतो, ठेवतो. संगणकाचा कार्यक्रम त्याच आशयावर आधारीत आहे .पेन्सिली साठी मला कोठेही जावे लागणार नाही, जर मला काही लिहायचे असेल, जर मला काही हिशेब करायचे असतील, जर मला एखादे चित्र काढायचे असेल तर पेन्सिलीची गरज भासणार नाही. संगणक हे एक व्यक्तिगत उपकरण असून digital technology मुळे हे सर्व काही साधणे शक्य होणार आहे. संगणक म्हणजे एक भविष्यकालीन पेन्सिल आहे. पेन्सिल याचा अर्थ की संगणक आपणासमवेत सदा सर्वकाळ राबणार आहेत. हवे तेव्हा उपयुक्त ठरणार आहेत ते ही विविध कामासाठी जर आपण संधी दिली तर आपणास असे दिसून येईल की हा कार्यक्रम लोक वेगवेगळ्या मार्गाने पद्धतीने भिन्न कामासाठी सहजपणे वापर करू लागतील.

आपण काही म्हणणार नसाल तरी हा कार्यक्रम म्हणत राहील "तुम्हाला युरोप, आफ्रीका, लैटीन अमेरीका, आशियाशी स्पर्धा करावी लागणार आहे. संगणक द्वारा आपण आपल्या मुलांना या सक्षम बनवणार आहोत. जेणे करून परिक्षेत/स्पर्धेत ते अन्य कोणाप्रमाणे चमकतील, नेतृत्व करतील आणि त्यांचे अनुकरण करतील तर ते चुकीचे ठरेल."

वैविध्यतेला उत्तेजन मिळावे म्हणून जर आपण हे तंत्रज्ञान वापरणार असू तर, आपल्यालालाच पुढाकार घ्यावा लागेल. आपणच परिक्षा पद्धती अशा बनवायच्या की अन्येतर त्यासाठी स्वत:हून तयारी सुरू करतील. अर्थात या परिक्षा म्हणजे सगळ्या प्रश्नाची सर्वानी बरोबरच उत्तरे दिली पाहिजेत असे नाही. या परिक्षा म्हणजे लोकच त्यांचे परिणाम मिळवू शकतील अशा असतील. योग्य उत्तरे देण्यासाठी माहीतीची गरज नाही.एखादे कार्य उद्दीष्ट, साध्य करण्यासाठी माहीती तंत्रज्ञानाचा व्यापक उपयोग व्हायला हवा. एखादे यंत्र बनवायचे असेल, एखादी कलाकृती तयार करायची असेल तर, काही सैध्दातिंक मांडणी करायची असेल. पण हे सर्व काही व्यक्तिगत हेतू या सदरात मोडते. एखाद्या शाळेतील अभ्यासक्रमाप्रमाणे लिखित किंवा बंधिस्त स्वरूपात तो असणार नाही.

Assembly Line Model कार्यक्रमाच्या नजरेतून पाहीले तर शाळा म्हणजे एखाद्या Assembly Line प्रमाणे असते. अर्थात ज्याने या यांत्रिक पद्धतीचा शोध लावला त्या हेनरि फोर्ड च्या काळात हा शोध म्हणजे एक महान शोध होता. त्याचप्रमाणे शाळा म्हणजे देखील महान शोध होता. पण त्यांचे स्वरूप यांत्रिकच होते. तुम्ही शाळेत येता इतरांप्रमाणे तुम्ही पहिल्या वर्गात पहिल्याच तासिकेस पहिल्याच दिवशी बसता. पुस्तकातील पहिला धडा शिकता. मग तुम्ही दुस-या, तिस-या तासिका करता. दुसरीत, तिसरीत जाता संगणक प्रमाणे ही Assembly Line आहे. दर क्षणाला तुम्हाला माहितीचा नवा तुकडा मिळत राहतो. याचे कारण असे की, या काळात आपल्याजवळ अंत्यत प्राथमिक असे शिक्षण तंत्रज्ञान होते ते म्हणजे खडू आणि फळा. आजच्या अद्यावत माहिती तंत्रज्ञानाकडे पाहिले की आपणास अशा Assembly Line ची गरज आहे का असे वाटत राहते. आपण माणसांचे वयोमानबध्द श्रेणी तयार न करता सर्वानाच म्हणजे ज्याना एखाद्या विषयात रस असेल, जे काम करण्याची/शिकण्याची खास शैली वापरतात, सामुहिकपणे कृती करतात अशा सगळ्याना हे शिक्षण देऊन लाभ घेण्यास का बरे प्रवृत्त करू नये?

आपण आपली मानसिकता बदलायला हवी जेणेकरून गणित म्हणजे आकडे-जोड-मोड-तोड असते जी आपण प्राथमिक शाळेत शिकलो आणि ज्याचा वापर फारसा कोणी करत नाही, हे वास्तव आपण लक्षात घेऊ. अशा पद्धतीने आपण बराच खर्चही करतो. वेळ घालवतो आणि अखेर निराश होतो. मनस्ताप करून घेतो. पण जर आपण सत्य स्वीकारले नाही आणि त्यानुसार मुलांचे शिक्षण केले नाही तर मात्र केवळ २ डाँलरला मिळणारा कँलक्युलेटर जेव्हढे काम करेल तेव्हढेही मुलांना करता येणार नाही.

हे साधायचे तर आपली मानसिकता बदलून तंत्रज्ञान मग ते पेन्सिलीच्या स्वरूपात, संगणकाच्या स्वरूपात किंवा महाजालाच्या स्वरूपात असो, प्रत्येक वर्गात जाणवेल इतपत तरी अंगीकारायला हवे. त्याचवेळी हे वास्तव पण स्वीकारायला हवे की आपल्याला केवळ एकाच नव्हे तर असंख्य मुलांना एक व्यक्तिगत संगणक द्यायला हवा. त्याचा वापर केवळ क्रमिक अभ्यासाठी करतील न करतील पण सृजनशील, व्यक्तिगत तसेच विभिन्न पद्धतीने हवे ते शिक्षण करतील. हे शक्य आहे. एखाद्या सर्वात श्रीमंत देशाला हे परवडणारे नाही असे मी कधीच म्हणणार नाही.

मला असे वाटते की, शालेय संगणिकीकरणासाठी खासगी क्षेत्राने जर सहाय्य दिले तर खरंच बहार येईल. पण आपले सरकार हे करणार नाही याचे मला वाईट वाटते. मला तर असेही वाटते की, २१ व्या शतकातील विद्यार्थ्याना शिक्षण इतिहास शिकविणारे शिक्षक त्या विद्यार्थ्याना २० व्या शतकातील अखेरच्या काही वर्षात शिक्षण तज्ञ प्रशासकीय अधिकारी, राजकारणी आणि धोरणे आखणारे लोक इतक्या अंतविरोधात्मक पद्धतीने का वागत होते ते स्पष्टीकरणासहित सांगण्यास भाग पाडतील.

माझ्या मते खरे कारण असे की, आपली शिक्षण पद्धती खूप खोलवर रूजली असून ती राबविण्यासाठी शेवटच्या क्षणाला देखील बराच संघर्ष करत आहे. आता तर हीच वेळ असून आपणास शिक्षणाचे नवनवे प्रयोग करावे लागणार आहेत. केवळ त्या द्ववारेच आपण शिक्षणात, जीवनात खरीखुरी विविधता निर्माण करू शकु.